1984 गुरुकुलच्या कार्याचा शुभारंभ. प्रारंभी फक्त शालेय शिक्षणात कार्यरत असलेल्या गुरुकुलला स्वतःचं
नाव 1995 मध्ये प्राप्त झालं. 1997 पासून गुरुकुल शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, क्षेत्रात
कार्यरत झाला. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील अग्रभागी असलेले जिवंत देखावे सादर करून
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले समाजप्रबोधनाचं पहिले पाऊल गुरुकुलने टाकले.
परमपूजनीय गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवाच्या माध्यमातून 2000 पासून
हिंदू संस्कृतीची रूढी परंपरा यांची माहिती समाजापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रारंभ झाला.
2005 पासून गुरुकुल अभिनय शाळेचा प्रारंभ झाला. रंगमंचावर वाटणारी भीती नष्ट व्हावी आणि वक्तृत्व
सुधारावे हा या मागचा उद्देश.... अनेक एकांकिकातून विद्यार्थी कलाकारांना, पालकांना सादर होण्याची
मिळणारी संधी हेच अभिनय शाळेचे वैशिष्ट्य.... गुरुकुलच्या प्रत्येक कार्यात युवकांचा मिळणारा सहभाग
आणि त्यातून निर्माण झालेली गुरुकुल युवाशक्ती असा प्रवास आपणा सर्वांच्या शुभ आशीर्वादाने चालू आहे.
आधी काम मग नाम हे तत्व गुरुकुल यांनी साकारले आणि आपल्या कार्यातून गुरुकुल हे नाव सर्वार्थाने
साकारण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण आपल्या सहकार्याने करत आहोत.
गुरुकुलचे कार्य ही परंपरा अखंड चालत राहावी या विचाराने कार्यरत असलेल्या गुरुकुल परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत🙏
परमपूजनीय सद्गुरु श्री गजानन महाराज
गुरुकुलच्या नूतन वास्तूचा शुभारंभ 19 जून 1998 रोजी वारकरी संप्रदायाचे हरी ह.भ.प. किसन महाराज साखरे यांच्या शुभहस्ते आणि सुप्रसिद्ध वकील श्री सुनील राडकर व ह.भ.प. अजित कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.